तुमचे सुख – दुःख हे माझेही सुख – दुःख : आमदार समाधान आवताडे साधणार ग्रामस्थांशी हितगुज

पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे आज सलगर बु.येथे मुक्कामी

मंगळवेढा, दि.०८ : तुमचे सुख – दुःख हे माझेही सुख – दुःख आहे अशी भावना व्यक्त करीत पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे आज रविवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० पासून सलगर बु येथे उपस्थित राहून येथील ग्रामस्थ, शेतकरी, महिला-भगिनी, व्यापारी, विविध क्षेत्रातील नोकरदार वर्ग यांच्याशी संवाद व चर्चा करणार आहेत. ते आज सलगर बु येथे मुक्कामी असणार आहेत.

सलगर बु येथील नियोजित मुक्कामी दौऱ्यात आमदार समाधान आवताडे हे या भागातील विविध विकास कामांची पाहणी करून सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर आमदार आवताडे हे येथील स्थानिक ग्रामस्थ, दुध उत्पादक शेतकरी, माजी सैनिक, बचत गट महिला-भगिनी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडीचणी व समस्या जाणून घेणार आहेत.

या दौऱ्यात ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, माजी सैनिक संघटना कार्यालय आदी संस्थात्मक ठिकाणी भेटी देत संबंधित अधिकारी, पदाधिकारी व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

आमदार समाधान आवताडे यांच्या या मुक्कामी दौऱ्यादरम्यान गावातील ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here