दहावी – बारावी परीक्षेचे टेन्शन येतेय.. आता नो टेन्शन

पुणे, दि.१७: परीक्षेच्या काळात सतत अभ्यास करून परीक्षेच्या तणावामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतान किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली विद्यार्थी वावरत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना या नकारात्मक विचारापासून दूर ठेवण्यासाठी व त्यांच्या मनावरील दडपण कमी करण्यासाठी राज्य मंडळाने विद्यार्थांचे ऑनलाईन समुपदेशन करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जेणेकरून विद्यार्थी उत्साहाने परीक्षेची तयारी करू शकतात.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ तसेच माहिती तंत्रज्ञान (LT.) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा २० ते दि. २३ मार्च २०२४ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करताना परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीतच विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यार्दीबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये याची नोंद घ्यावी.

समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे

१) ७३८७४००९७०
२) ९०१११८४२४२
३) ८४२११५०५२८
४) ८२६३८७६८९६
५) ८३६९०२१९४४
६) ८८२८४२६७२२
७) ९८८१४१८२३६
८) ९३५९९७८३१५
९) ७३८७६४७९०२
१०) ९०११३०२९९७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here