मंगळवेढा, दि.२६ : प्रेरणा प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिल्या जात असलेल्या राज्यस्तरीय ‘कृतिशील शिक्षक’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कारप्राप्त सन्मानार्थिना सदर पुरस्कारांचे वितरण लवकरच मान्यवरांचे हस्ते समारंभपूर्वक प्रदान केले जाणार असल्याची माहिती प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी दिली.
राज्यस्तरावर प्रतिष्ठीत समजले जाणारे हे कृतिशील शिक्षक पुरस्कार १९९० पासून प्रदान केले जात असून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय या चार विभागात कार्यरत शिक्षकांना दिले जातात. यंदाच्या मानकर्यांची निवड प्रा.विश्वनाथ ढेपे यांच्या अध्यक्षतेखालील प्रकाश जडे, ए.बी. शेख, संभाजी सलगर, दिगंबर भगरे, रेखा जडे, अर्चना सलगर यांच्या निवड समितीने केली.
कृतिशील शिक्षक पुरस्काराचे मानकरी –
प्राथमिक विभाग –
– वैशाली राजाराम शिंदे, जि.प.प्रा. शाळा एरंडगाव, ता गेवराई जि. बीड
माध्यमिक विभाग –
– श्री. विजयकुमार प्रल्हाद गुळमिरे, शेठ अगरचंद कुंकुलोळ प्रशाला ,बार्शी जि.सोलापुर
– श्री. तानाजी पाटलु पाटील, माध्यमिक आश्रम शाळा, येड्राव-खवे, ता.मंगळवेढा, जि.सोलापुर
उच्च माध्यमिक विभाग-
– प्रा.तात्यासाहेब शिवाजी काटकर , सदाशिव माने विद्यालय, अकलुज, जि.सोलापुर
महाविद्यालय विभाग –
– प्रा.डाॅ.महेश खरात, विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापुर जि.छत्रपती संभाजीनगर.
– प्रा.डाॅ. सुनंदा शेळके, तुळजाराम चतुरचंद काॅलेज, बारामती, जि.पुणे.