शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरच्या चेअरमनपदी क्रांतीताई आवळे यांची निवड

वाघोली, दि.२४: शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेच्या चेअरमनपदी संस्थेच्या खजिनदार क्रांतीताई अब्राहम आवळे यांची तर व्हाईस चेअरमनपद सचिन शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महात्मा गांधी विद्यालय, वाघोली येथे शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेच्या पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व संचालकाच्या एकमताने बिनविरोध चेअरमनपदी क्रांतीताई अब्राहम आवळे तर व्हाईस चेअरमनपदी सचिन शिवाजी पाटील म्हणून यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सर्व नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, नवनियुक्त संचालक मंडळ व यांच्याबरोबर तानाजी देशमुख, चिदानंद माळी, कृष्णदेव चौगुले, महेंद्र शिंदे, चंद्रकांत लाड, खंडाप्पा जिरगे, उमेश हेगडे, सचिव नानासाहेब खराडे श्रीकांत लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनियुक्त चेअरमन क्रांतीताई अब्राहम आवळे व व्हाईस चेअरमन सचिन शिवाजी पाटील यांचे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, संस्थेचे सचिव अभिजीत ढोबळे साहेब, सर्व संस्थेच्या संचालक मंडळ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी प्राचार्य चिदानंद माळी यांनी नूतन चेअरमन क्रांतीताई आवळे, व्हाईस चेअरमन सचिन पाटील व सर्व संचालक मंडळ यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here