योगासन स्पर्धेत जवाहरलाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; गौरी मोरे व सुजल खरबडे स्पर्धेत प्रथम

मंगळवेढा, दि.14 : मंगळवेढा तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत जवाहरलाल हायस्कूलच्या इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या गौरी नितीन मोरे व सुजल सचिन खरबडे या विद्यार्थ्यांने 14 वर्षे मुले या वयोगटात ट्रॅडिशनल योगासन व आर्टिस्टिक योगासन या दोन्ही स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत जवाहरलाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

तालुकास्तरीय योगा स्पर्धेचे जवाहरलाल हायस्कूल मंगळवेढा येथील योगा हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 14 वर्ष मुलांच्या गटात आयुष महादेव धोत्रे इयत्ता सहावी व रुद्र बिरा चौगुले इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेत तिसरा व चौथा क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. 14 वर्षे मुली या वयोगटातून आराध्या पांडुरंग शिंदे , वैष्णवी सिद्धेश्वर माळी व चैतन्य काका चव्हाण इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी ट्रॅडिशनल योगासन खेळ प्रकारात दुसरा ,चौथा व पाचवा क्रमांक मिळवला या वयोगटातील तनया अमोल मोरे इयत्ता सातवी हिने आर्टिस्टिक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. 17 वर्ष मुले या वयोगटात चैतन्य पांडुरंग शिंदे इयत्ता दहावी याने ट्रॅडिशनल योगासन प्रकारात द्वितीय क्रमांक तर रीथमिक योगासन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. वरील सर्व विद्यार्थ्यांची 14 व 15 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील संतोष दुधाळ, नितीन मोरे, शिवकुमार स्वामी व शहाजी ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर आवताडे व मंगळवेढा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा रतनचंद शहा बँकेचे चेअरमन आदरणीय राहुलजी शहा व संस्थेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here