महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

सोलापूर, दि. 22 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 62 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे .त्यानिमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातील विविध तालुका शाखांच्या वतीने अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना 22 जुलै 1962 रोजी झालेली आहे . छात्र शिक्षकांना विद्यावेतन वाढवून मिळाले पाहिजे या मागणीसाठी 1960 च्या दशकांत छात्र शिक्षकांनी तीव्र लढा उभारला आणि तो यशस्वी देखील झाला. तत्कालीन युवा शिक्षकांनी एकत्र येऊन पुढे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना केली. महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ञ बॕ.पी.जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पहिले अधिवेशन होऊन यामध्ये पहिले अध्यक्ष म्हणून महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांची अध्यक्षपदी तर भा.वा. शिंपी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. या संघटनेची स्थापना , बांधणी आणि कार्य विस्तार यामध्ये सोलापूरची भूमिका महत्त्वाची ठरलेली होती त्यामुळे राज्याचे पहिले सरचिटणीस म्हणून वि.भा.येवले यांची एकमताने निवड झाली होती.

स्व. वि.भा. येवले यांनी सोलापूर जिल्ह्यात लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. पूर्वी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदाची निवड संपूर्ण जिल्ह्यातील सभासद करीत असत अशा काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी येवले गुरुजी यांना दोनवेळा बहुमताने निवडून देत शिक्षक समितीच्या नेतृत्वावर विश्वास टाकला होता. आज मुरारजी पेठ येथे असलेल्या संस्थेच्या इमारतीचे बांधकाम त्यांच्याच कारकिर्दीत झाले आहे . जिल्ह्यातील नव्या जुन्या पिढीतील हजारो कार्यकर्त्यांनी कष्टाने ही संघटना बांधली असून ही संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार केल्याचे सरचिटणीस शरद रुपनवर यांनी सांगितले.
आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिवसभरात जिल्ह्यातील विविध शाळांतून वृक्षारोपन , शैक्षणिक साहित्य वाटप , विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असे उपक्रम राबविले जाणार आहेत . विशेषतः यंदाच्या नविन शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील शाळांतून इयत्ता पहिलीत 30,255 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक शाळा प्रवेश झाले आहेत ही अत्यंतिक आनंदाची बाब आहे.शिवाय अनेक शाळांना दीर्घ प्रतिक्षेनंतर शिक्षक देखील उपलब्ध झाले आहेत. म्हणून विशेषतः इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दुरेघी वही , उजळणी , पेन्शिल , खोडरबर अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक समितीचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here