चिमुकल्यांची वारी, वृक्षलागवडीच्या दारी…

लहान मुलांमध्ये झाडांप्रती आणि निसर्गाप्रती प्रेमभाव व जवळीकता वाढावी यासाठी छत्रपती प्रतिष्ठान वृक्षसंवर्धन समितीचा वृक्षलागवडीचा उपक्रम

मैंदर्गी, दि.१८ : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्ताने मैंदर्गी (ता.अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील इरा इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी निघाली आणि ती थेट पोहोचली वृक्षलागवडीसाठी. पहिली दुसरीतील विद्यार्थी या दिंडीत सहभागी होते गावातील विठ्ठल मंदिराला भेट देऊन दिंडी थेट पोहोचली ती वनविभागाच्या परिसरात.

छत्रपती प्रतिष्ठान वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने यावर्षी ५५५ स्थानिक वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये झाडांप्रती आणि निसर्गाप्रती प्रेमभाव व जवळीकता वाढावी यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात सहभागी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाड लावण्याचे महत्त्व सांगण्यात आले.
इरा इंग्लिश मिडीयमच्या अध्यक्षा श्रीमती वंदना राजशेखर सवळी व सचिव जोतिबा चव्हाण यांच्या हस्ते वड आणि बकुळ हि रोपे लावण्यात आले.

यावेळी बोलताना श्रीमती वंदना सवळी यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीचे महत्त्व सांगून आपल्या वाढदिवसाला प्रत्येकांने एक झाड लावावे असे आवाहन केले.

या अनोख्या दिंडी सोहळ्यात इरा इंग्लिश मिडियमचे अंबिका सिंदगी, शारदा वच्चे, आदिती सवळी, साचे, कोरचगांव, बसवराज निंगदळ्ळी, शिवकुमार कण्णी आदी शिक्षकवर्गासह छत्रपती वृक्षसंवर्धन समितीचे योगेश फुलारी, समर्थ नागूर, अनिल जुजगार, गुंडाराज नाशी, रमेश देगांव, मल्लिनाथ गोब्बूर, सुमित फुलारी, गिरीश काबणे, गणेश गोब्बूर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here